प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर :- ८ मार्च हा दिवस दरवर्षी महिलादिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.यादिवशी विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो. या कार्यक्षम दिवसाचे औचित्य साधून आज भाजपा मध्य मंडळ चंद्रपूरच्यावतीने विविध क्षेत्रातील तीन महिलांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डाॅ.वनिता गर्गेलवार,शैक्षणिक क्षेत्रातील सन्मित्र काॅन्वेंटच्या सहाय्यक शिक्षिका स्मिता चन्ने व महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागतील राजेश्वरी किल्लन यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,भाजपा ग्रामीण किसान मोर्चा जिल्हा महामंत्री राजेंद्र खांडेकर,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,भाजयुमो मंडळ महामंत्री नकुल आचार्य,भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हा उपाध्यक्ष शेलेश इंगोले,बुथ प्रमुख कार्तिक मुसळे,भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हा महामंत्री सुभाष आदमने, भाजपा नेते अरविंद कोलनकर, युवा नेते श्याम बोबडे, अमय सगदेव, प्रसाद काटपाताळ, अनिल देहनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

