
उषा नाईक
महिला विदर्भ संपादक
अमरावती
वाशिम, दि.२६ – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधिज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय, बोरी मापारी ता. जि. वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे गजानन मापारी यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा विविद्रभधिज्ञ संघ वाशिम ॲड. व्ही. एम. तिफणे यांनी पाणी साठवण व जलसंधारण या विषयावर मार्गदर्शन केले तर ॲड. डी. डी. गुडदे यांनी प्रदुषण मुक्त हवा व पाण्याचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिपक बनसोडे यांनी केले.
या कार्यक्रमास नागरिक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, लोक अभिरक्षक, विधिज्ञ मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.














