सभासदांची व्यापारी संघात एकजुटता निर्माण असणे गरजेचे – सदानंद खत्री
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही शहरातील व्यापारी असोसिएशन, सिंदेवाही-लोनवाहीचे वतीने आमसभा व होलीमिलन कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा व्यापारी महासंघ चंद्रपूर अध्यक्ष सदानंद खत्री यांचे उपस्थितीत तुलसी लॉन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम बुधवार दिनांक 27 मार्च 2024 ला सायंकाळी 7. 00 वाजता तुलसी लॉन सिंदेवाही येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा व्यापारी महासंघ चंद्रपूर अध्यक्ष सदानंदजी खत्री, कोषाध्यक्ष अनिल गुप्ता, शहर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष दिलीप दुस्सावार, सचिव श्याम छत्रवाणी,उपाध्यक्ष अलोक सागरे,ज्येष्ठ सत्कारमूर्ती, कार्यकारणी मंचावर होते.
कार्यक्रमाला पाहुण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन, पुष्पगुच्छ शाल श्रीफळ सत्कार करण्यात आले. दिवंगत व्यापारी बंधूंना श्रद्धांजली देण्यात आली. व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप दुस्सावार यांनी नावीन्यपूर्ण उद्दिष्ट साधने करीता प्रास्ताविकतेने सूचित केले.प्रमुख पाहुणे जिल्हा व्यापारी महासंघ चंद्रपूर अध्यक्ष सदानंदजी खत्री यांनी सभासदांची व्यापारी संघात एकजुटता निर्माण गरजेचे.असल्याचे आपले मार्गदर्शनपर भाषणात उल्लेखनीय कार्य असल्याचे बोलले. आमसभेचा जमाखर्च अहवाल वाचन आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहसचिव संदीप बांगडे यांनी केले. व्यापारी असोसिएशन चे वतीने होलीमिलन सोहळ्यातील फटाक्यांची आतिषबाजी, रंगारंग ऑर्केस्ट्रा, आमसभा, स्नेह भोजनाचा आस्वाद नोंदणीचा सभासद सर्व उपस्थित व्यापारी बंधुला भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रमाला ज्येष्ठ व्यापारी सत्कारमूर्ती, कार्यकारणी, सभासदांचे तसेच उपस्थितांचे मनःपूर्वक आभार संदीप बांगडे यांनी केले.

