कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिंनिधी,
चंद्रपुर
चंद्रपूर : शासनाने ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंस्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल (CEV) व कम्बाईन हार्वेस्टर या संवर्गातील नवीन वाहन नोंदणी विषयी वायप्रदूषण मानके व इंजिन क्षमता या अनुषंगाने नोंदणी करीता वैधता जारी केली आहे. यानुसार या संवर्गातील वाहनांची नोंदणी 31 मार्च 2024 पूर्वी करणे आवश्यक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
31 मार्चपूर्वी नोंदणी करणे आवश्यक असलेल्या संवर्गात ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कम्बाईन हार्वेस्टर 37 किलो व्हॅट पेक्षा जास्त परंतु 560 किलो व्हॅटपर्यंत (पावर) तसेच 37 किलो व्हॅट पेक्षा (पावर), कंस्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेईकल (CEV) 37 किलो व्हॅट पेक्षा जास्त परंतु 560 किलो व्हॅटपर्यंत (पावर) तसेच 37 किलो व्हॅट पेक्षा (पावर) या वाहनांचा समावेश आहे.
सर्व वाहन वितरक व वाहन मालक यांच्या सोयीसाठी 31 मार्च पर्यंत सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले असल्याने वाहन नोंदणी करणे सोयीचे जाणार आहे. तरी या संवर्गातील सर्व वाहन वितरक व वाहन मालक यांनी नवीन वाहनांची नोंद करून घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

