विजेते व सहभागी स्पर्धकांना पारितोषिक वितरण उत्साहात
शारदा भुयार
महिला जि. प्रतिनिधी,
वाशिम
वाशिम – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेच्या संशोधन विभागामार्फत दरवर्षी राज्यभरातील काहीतरी नवे करू पाहणाऱ्या शिक्षक व शिक्षण यंत्रणेतील घटकांच्या विद्यार्थीकेंद्री सर्जनशील कृतींना व्यासपीठ मिळवून त्याचा फायदा राज्यभरातील शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी व्हावा या हेतूने नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते. सदर स्पर्धेचे जिल्हास्तर विभागस्तर व राज्यस्तर असे स्वरूप असते.
याचाच एक भाग म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वाशिम येथे दिनांक २६ मार्च रोजी नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये विजेते व सहभागी स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सन २०२२-२३ जिल्हास्तर नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक आरती भीमराव गंगावणे जि.प. प्राथ. शाळा वारला ता. वाशिम, द्वितीय क्रमांक मिनाबाई पांडुरंग नगराळे जि.प. प्राथ. शाळा कोकलगाव ता. वाशिम, तृतीय क्रमांक साधना मुकुंदराव पिंपळकर जि. प. उ. प्राथ. शाळा चांडस ता. मालेगाव, चतुर्थ क्रमांक वंदना भगवान इंगळे जि.प. उ. प्राथ. शाळा भटउमरा ता. वाशिम, पाचवा क्रमांक मेघा फुलचंद जाधव जि. प. उ. प्राथ. शाळा उमराळा ता. वाशिम, उत्तेजनार्थ पारितोषिक रणजीत राजूसिंग जाधव जि. प. उ. प्राथ. शाळा कारखेडा ता. मानोरा, माध्यमिक – उच्च माध्यमिक गटामधून प्रथम क्रमांक संतोष दामोदर पेठे यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळांबा ता. वाशिम यांनी पटकावला.
नवोपक्रम स्पर्धा २०२३-२४ मध्ये ज्या शिक्षकांनी सहभाग घेतला अशा उपस्थित अनिता गंगाधर गोजे जि. प. उ. प्रा. शाळा पिंपळगाव ता. वाशिम, मेघा फुलचंद जाधव जि. प. उ. प्राथ. शाळा उमराळा ता. वाशिम, ज्योती अरुण देशमुख जि. प. उ. प्रा. शाळा काटा ता. वाशिम, सुरेखा प्रल्हादराव देबाजे जि. प. उ. प्रा. शाळा वाई ता. वाशिम, वंदना भगवान इंगळे जि. प. उ. प्रा. शाळा भटउमरा ता. वाशिम, प्रीती मधुकर सावळकर जि. प. उ. प्रा. शाळा नेतन्सा ता. रिसोड यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन २०२३-२४ जिल्हास्तर नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक उषा प्रवीण हाडे जि. प. उ. प्राथ. शाळा भरजहॉगिर ता. रिसोड, द्वितीय क्रमांक अश्विनी अशोककुमार बुंधे जि. प. उ. प्राथ. शाळा देवठाणा ता. मानोरा , तृतीय क्रमांक ज्योती सचिन खुपसे जि. प. उ. प्राथ. शाळा शिवाजीनगर ता. मानोरा, चतुर्थ क्रमांक आरती भिमराव गंगावणे जि.प. प्राथ. शाळा वारला ता. वाशिम, पाचवा क्रमांक आकाश आल्हाद रोकडे न. प. महात्मा फुले विद्यामंदिर ता. वाशिम तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक सुधीर कुमार जगदेव चवरे न. प. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर ता. वाशिम व विजया वासुदेवराव भोंडे जि. प. उ. प्राथ. शाळा सवड ता. रिसोड यांनी पटकावला. माध्यमिक – उच्च माध्यमिक गटामधून प्रथम क्रमांक संतोष दामोदर पेठे यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळांबा ता. वाशिम व द्वितीय क्रमांक वैशाली दाजिबा शिंदे जागेश्वरी विद्यालय कार्ली ता. वाशिम यांनी पटकावला.
सन २०२३-२४ विभागस्तर नवोपक्रम स्पर्धेत तृतीय क्रमांक स्वाती राजेंद्र नाचोने विशेष शिक्षक गटसाधन केंद्र वाशिम , चतुर्थ क्रमांक नामदेव पांडुरंग सरदार केंद्रप्रमुख गटसाधन केंद्र वाशिम , पाचवा क्रमांक आनंद संभाजी सुतार केंद्रप्रमुख गटसाधन केंद्र वाशिम व स्वाती हरिकिसन ढोबळे विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र वाशिम तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक अशोकराव सदाशिवराव महल्ले केंद्रप्रमुख गटसाधन केंद्र वाशिम व धनराज गांजी मेहल्डे विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र मानोरा ता. मानोरा यांनी पटकावला.
सन २०२३-२४ राज्यस्तर नवोपक्रम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मोतीराम तुकाराम जाधव समावेशित शिक्षण साधन व्यक्ती गटसाधन केंद्र मानोरा ता. मानोरा यांनी पटकावला. याप्रमाणे जिल्हास्तर विभागस्तर व राज्यस्तरावर विजेते आणि सहभागींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भा. भ. पुटवाड, शिक्षणाधिकारी (योजना) वि. के . भुसारे, विभागप्रमुख विलास कडाळे ,शिवशंकर मोरे, जिल्हा समन्वयक संजीवनी दारोकार, स्वाती ढोबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभात सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे कौतुक करून यासारख्या विविध उपक्रमामध्ये जिल्हाभरातील अधिकाधिक शिक्षकांनी दरवर्षी जास्त प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

