गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ सिंदेवाही येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन

0
75

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सध्या केंद्रात भाजप सत्तेत आहे. तर भाजपने आपले अपयश लपविण्यासाठी देशात धर्मांधता पसरविणे, जाती जातीत तेढ निर्माण करणे व बहुजनांना दिशाहीन करुन देशातील लोकशाही पुरस्कृत संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. अश्या मनुस्मृति विचारांचे सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपण एक निष्ठावान कार्यकर्ते व मजबूत बूथ प्रमुख म्हणुन जोमाने कामाला लागावे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ आयोजीत कार्यकर्ता संवाद बैठकीचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

तर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान मार्गदर्शन पर बोलतांना म्हणाले की, भाजप हा लोकप्रिय पक्ष नसून बहुजनांचे मते विभागणी करून त्यात फूट पाडत सत्ते पासून रोखण्यात यश मिळविले आहे.तर देशातली केवळ 37 टक्के मतदारांनी भाजपला मतदान केले. व डिवाईडेड रुल पॉलिसी वापरून भाजपने सत्ता काबीज केली. आता सत्तेच्या बळावर जनतेची लूट करुन दिशाभूल करण्याचे राजकारण करित व्यापाऱ्यांचे खिशे भरण्याचे पाप भाजप करीत आहे. आपले भाजप खासदार अशोक नेते यांना जनतेच्या अपेक्षा, प्रश्न व समस्या यांची तिळमात्र जाण नसून जनतेच्या अपेक्षावर ते सपेशल अपयशी ठरले आहे. आता आपणच निर्धार करुन आपल्याला काम करणारा खासदार पाहिजे की निष्क्रिय पाहिजे हि ठरवण्याची वेळ आली आहे.
कार्यक्रमांचे प्रास्तविक व सूत्र संचालनातून तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी उमेदवार डॉ नामदेव किरसान यांचे शैक्षणिक पदव्या, शासकीय अधिकारी म्हणुन बजावलेली कामगिरी, विकासात्मक दूर दृष्टिकोन व पक्ष संघटनात्मक धडाडी याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मंचावर महाविकास आघाडी घटक पक्षाचे तसेच इंडिया आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here