बाबुराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
परभणी- गेल्या अनेक वर्षापासून परभणी शहरात शहीद भगतसिंग सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी यांच्या वतीने समाजातील गोरगरीब गरजू निराधार निस्वार्थ मदत करत असते या संस्थेच्या वतीने 14 एप्रिल 2024 येणाऱ्या भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे.
या जयंती संदर्भात आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी शहरातील डॉ.आंबेडकर नगर आयटीआय कॉर्नर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणी प्रमोद अशोकराव अंभोरे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी युवा समाजसेवक हरदीप सिंग बावरी यांची, मुख्य प्रवर्तक पदी दिलीप बनकर, सल्लागार पदी पत्रकार राहुल धबाले यांची तर सचिव पदी शेख सरफराज, सहसचिव वैशाली साळवे, कोषाध्यक्ष तथा क्रीडाध्यक्ष पदी संदीप वायवळ, आदींच्या सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य प्रकाश अंभोरे, राहुल घोंगडे, शंकर बनसोडे, विनोद वाडेकर, दीपक बनसोडे, सिद्धार्थ गायकवाड, शुभम कोरडे आदी. या निवडीबद्दल प्रमोद अंभोरे व हरदीप सिंग बावरी यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे..

