जास्मिन शेख
चंद्रपूर प्रतिनिधी
नेत्र कमल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर व माणूसकी ग्रुप चंद्रपूर यांच्या द्वारे आयोजित नृत्य व फॅशन शो स्पर्धा महिला दिना निमित्त
महिला दिनाचे ओचीत्य साधून खास महिलांकरिता नेत्रकमल बहुउद्देशीय संस्था यांनी घर सांभाळून महिला स्वतःची आवड पूर्ण करण्याकरिता महिलांना ही संधी देण्याचे कार्यक्रमाच्या आयोजक नेत्रा जगदीश इंगुलवार यांनी हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थाणी उपस्थित प्रभा चीलके,ब्रीजभूषण पाझारे, पंकज पाटील, शुभम गोविंदवार,राखी रेड्डीवार,स्वाती कत्तूरवार,पूनम पाटील, योगीता पाटील,नलिनी गांद्रटवार,कविता गादेवार हे होते तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन हे अमोल कडूकर यांनी सांभाळले कार्यक्रम अतिशय शांत पद्धतीत पार पाडण्या करिता संस्थेच्या अधक्ष्या नेत्रा इंगुलवार यांनी खूप महेनत घेतली तसेच माणुसकी ग्रुप मेंबर्स यांनी कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडावा या करिता खूप मेहेनत घेतली माणुसकी ग्रुप मेंबर्स विशाल रामगिरवार , जास्मिन शेख,विनोद पेनल्लिवार, सागर ढोरेकर, सुशांत धकाते, सतीश मडावी,सुरज बिटे, स्नेहा पुडके,रूपा काटकर, शिवम, सारिका टेंभरे यांनी कार्यक्रमा ची जिम्मेदारी अतीशय चांगल्या प्रकारे पारपडली या कार्यक्रमाचे डान्स ग्रुप जे विजेते झाले त्यात पहिला क्रमांक महाकाली ग्रुप यांनी पटकाविला तर दुसऱ्या स्थानावर गोल्डी ग्रुप बाबूपेठ व तिसऱ्या स्थनावर नटराज डान्स ग्रुप यांनी मिळविला तर फॅशन शो मध्ये विजेती सुरभी इंगुलवार हिने पटकाविला व दुसरा प्रिया रामटेके तर तिसरा क्रमांक कोमल चाव्हण या झाल्या व सोलो डान्स मध्ये प्रिया अगडे हिने प्रथम क्रमांक तर दुसऱ्या क्रमांकावर रीना सिंग व तिसऱ्या क्रमांकावर सुनिता घिवे हिने पटकाविला हा कार्यक्रम शांती पूर्वक पार पडला या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेणारे कार्यकरते बंटी , विशाल रामगिरवार, जास्मिन शेख,विनोद पेनल्ली वार,यांनी विशेष सहकार्य केले.पूजा पेंनल्लिवार ल, अल्का रामगिरवार ,माधुरी सुटे, सुष्मा नगराळे उपस्थित होते.

