प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
काँग्रेस पक्षासाठी नेहमीच एकनिष्ठतेने काम करणाऱ्या डॉ. ऐश्वर्री राठोड यांची काँग्रेस कमिटी जळगाव जिल्ह्यातर्फे “जिल्हा सरचिटणीस “म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. ऐश्वर्री राठोड या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये नेहमी सामाजिक कार्य आणि तसेच पक्षाचे काम एकनिष्ठतेने केल्यामुळे पक्ष वाढीस भरभक्कम अशी साथ दिल्यामुळे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तसेच जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी नेहमीच काँग्रेस पक्षासाठी डॉ.ऐश्वर्या राठोड यांनी सक्रिय सहकार्य भाग आपल्या कार्यकाळामध्ये केलेला आहे. या पदाची नियुक्ती रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते, आणि तसेच जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, संदीप भैय्या पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, जमील शेख ,ज्ञानेश्वर कोळी यांच्या हस्ते देण्यात आले. त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनचे वर्षा डॉ. ऐश्वर्री राठोड यांच्यावर होत आहेत.

