विशाल भिवा निलेवाड या युवकांचा १८ एप्रिल रोजी होता लग्न
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
उदगीर तालुक्यातील लोहारा येथे दुचाकी व कारचा भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना १० एप्रिल रोज बुधवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली आहे.लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विशाल भिवा निलेवाड निलेवाड वय २२ वर्ष व आकाश धोंडिबा निलेवाड वय २३ वर्ष दोघेही राहणार अनुपवाडी ता.उदगीर हे लग्न पत्रिका देण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच.२४ बीक्यू ५८५३ वरून उदगीर येथून करडखेल येथे जात असताना लातूरहुन उदगीरकडे येणारी एम.एच.१२ एनई ९१६३ या क्रमांकाच्या कार चालकाने दुचाकीला लोहारा दूध डेअरी जवळ उदगीर लातूर रोडवर समोरून जोराची धडक दिली.
यात विशाल भिवा निलेवाड,आकाश धोंडिबा निलेवाड हे दोघे युवक जागीच ठार झाले, या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते,पोलीस हेडकॉन्स्टेबल पडिले,नागरगोजे,पोलीस नाईक नाना शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले,व रोटी कपडा बँक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला त्या ठिकाणी रोटी कपडा बँकेचे शेख गौस, शेख समीर,खुर्शिद आलम, शेख जमील यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही युवकांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले,डॉक्टरांनी दोघा युवकांची तपासणी करून मृत घोषित केले, मयत विशाल भिवा निलेवाड यांचा १८ एप्रिल रोजी लग्न होते,लग्नाच्या अगोदर त्याच्यावर काळाने घाला घातला, या घटनेमुळे उदगीर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अपघात ठार झालेले दोघेही सख्खे चुलतभाऊ होते.

