उदगीर-निलंगा राज्य मार्गावर धनेगाव जवळ घडली घटना
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
निलंगा – ऊदगीर राज्य मार्गावर असलेल्या धनेगाव ता.देवणी जवळ बुधवारी दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.सदरील मयत हे मध्यप्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एमपी ०९ डीई ५२२७ ही इरटिका कार ही वलांडी हुन निलंग्याकडे जात असताना समोरून येणारी ट्रक क्रमांक एम एच २४ जे ७३६५ यांची जोराची धडक बसली.या अपघातात कार मधील चौघाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.
मयतात संजय जैन वय ४५, व दुसरा मयत ही संजय जैन वय ४२, ईंदौर मध्य प्रदेश असल्याचे समजते अपघात इतका भयंकर होता की, कारचेंदामेंदा झाला असुन जेसीबीच्या सहाय्याने कारचा पत्रा कट करून मृतदेह बाहेर काढण्यात आले.यावेळी देवणी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिकराव डोके व सहकारी रामलींग शेरे,हाकीम बौडीवाले, संजय बोरसुरे,गुरूनाथ जाधव धनेगाव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
मयताच्या ओळखीचे प्रयत्न पोलिसांकडुन सुरू आहेत.घटनास्थळावर बघ्याची खुप मोठी गर्दी झाली होती.

