प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम असा रामनामाचा गजर सुरू असताना श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा पुढे सरकत असताना संस्कारभारती चंद्रपूर शाखेच्या सदस्यांनी रेखाटलेल्या सुरेख रांगोळीने चंद्रपूरातील रामभक्तांचे लक्ष वेधुन घेतले.
रामनवमी निमीत्त चंद्रपूर संस्कार भारतीने स्थानिक कात्यायनी रूग्णालयासमोरील प्रशस्त जागेत महारांगोळी काढली. यावेळी संस्कार भारतीच्या पदाधिका-यांनी श्रीराम शोभायात्रेचे आरती ओवाळुन स्वागत केले.
संस्कार भारती चंद्रपूर महानगर शाखेचे रांगोळी विधाप्रमुख सुहास दुधलकर यांच्या संकल्पनेतुन ही महारांगोळी साकारण्यात आली. या प्रक्रियेत मयुरी येणारकर, तृप्ती सोनकुसरे, कल्याणी पवार, प्रणाली पांडे यांनी सुहास दुधलकर यांना सहकार्य केले. प्रत्येक रामभक्ताने रांगोळीचे कौतुक करत संस्कार भारतीच्या पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्कार भारतीच्या अध्यक्षा संध्या विरमलवार, जिल्हा महामंत्री मंगेश देऊरकर, अजय धवने, उपाध्यक्ष राम भारत, भावना हस्तक, लिलेश बरदाळकर,जागृती फाटक, प्रणाली पांडे, स्वरूपा जोशी, अपर्णा घरोटे, पूर्वा पुराणिक, किरण पराते, क्षमा धर्मपूरीवार, प्राजक्ता उपरकर आदींची उपस्थिती होती.
पुनम झा ठरल्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण
संस्कार भारती चंद्रपूरच्या नृत्यविधा प्रमुख पुनम झा या शोभायात्रेत प्रभु श्रीरामचंद्राचया वेशभुषेत सहभागी झाल्या होत्या. आकर्षक रंगभुषा व वेशभुषेच्या माध्यमातुन प्रभू श्रीराम साकारत त्या कौतुकाचा विषय ठरल्या. त्यांनी महारांगोळीला भेट दिली. त्यावेळी संस्कार भारतीच्या पदाधिका-यांनी औक्षण करून त्यांचे अभिनंदन केले.

