प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज पूर्णा येथील महा बौद्ध विहारात परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय हरि जाधव यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो यांची चैत्र पौर्णिमाच्या शुभ मुहूर्तावर भेट घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिध्दार्थभाऊ हत्तीअंबीरे यांच्यासह संजय हरिभाऊ जाधव यांनी विहारातील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय हरि जाधव यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बौद्ध समाज बांधव,काँग्रेस अनुसूचित जाती विभाग व महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

