रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रह्मपुरी नगर परिषद यांच्या द्वारे संचालित खेड रोड वर स्थित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प याला आज ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
तेथे उपस्थित नगर परिषदचे कर्मचारी पठाण यांनी विद्यार्थ्यांना या प्रकल्पाबद्दल विस्तृत पने माहिती दिली.
आपल्या शहरातून कचरा कश्या पद्धतीने गोळा केल्या जातो, त्याचे वर्गीकरण कसे केले जाते व विविध उपकरणे व प्रक्रियेचा वापर करून त्याचे वेगवेगड्या पद्धतीने वापर कसा केल्या जातो हे त्यांच्या द्वारे समजविण्यात आले.
या मध्ये सुख्या कचऱ्याचे पुनर्वापर, गांडूळ खताची निर्मिती, मल पासून खत व पाण्याचे शुद्धीकरण, बायोगॅस निर्माण करून त्या पासून परिसरातील पथदिवे सुरू करणे अशे विविध उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना शिकायला मिडाले.
या प्रकल्पाची क्षमता 2 मॅट्रिक टन आहे. आपल्या घरातील कचरा नगर परिषद वेगवेगडे करायला सांगते परंतु त्या मागचा हेतू काय असतो हे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांना एका दैनदिन कृती बद्दल वेगडी जिज्ञासा व आदर निर्माण झाले.

