बीड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या बीड शहरत होत असलेल्या श्रद्धेय अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्ता परिवर्तन सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित राहून विजयाचे साक्षीदार व्हा असे आवाहन बीड पूर्व जिल्ह्या प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीचा तिसरा म्हणजे अंतिम टप्पा चालू असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा प्रचारही जोरात चालू आहे अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील विराट सभेनंतर उद्या दिनांक आठ मे रोजी माने कॉम्प्लेक्स परिसरातील पारस नगरी ग्राउंड वर श्रद्धेय अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची भव्य ऐतिहासिक सत्ता परिवर्तनाची नांदी ठरणारी सभा होत आहे जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून विजयाचे शिल्पकार व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पूर्व बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.

