डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबीर संपन्न

0
55

भारतीय बौध्द महासभा जिल्हा परभणी, बुध्दभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी आणि आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन यांचा स्तुत्य उपक्रम

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी – भारतीय बौध्द महासभा जिल्हा परभणी, बुध्दभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी आणि आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर दिनांक 28 एप्रिल रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, राहूल नगर, रघुदास सोसायटी, अशोक नगर पाटीजवळ संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन बाबुराव भराडे सर (असिस्टंट जनरल मॅनेजर,रिजर्व बैंक ऑफ इंडिया ) यांच्या हस्ते करण्यात आले. कर्यकराचे आयोजन डॉ. गणेश भांगे सर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, परभणी) डॉ. संघमित्रा उबाळे (भांगे) ( जिल्हाकोषाध्यक्ष दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) यांनी केले होते. या शिबिराला डॉ. प्रकाश डाके, उपा. सायस मोडक, इंजि. अरविंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती तसेच भारत उबाळे, राहुल वहिवाळ, अमर गालफाडे, प्रकाश वाघ, सुमंगला उबाळे, शितल वाकळे, अभिनेत्री प्रियंका उबाळे, श्वेता साळवे यांची उपस्थिती होति. या शिबिराला डॉ. सुधाकर पोले, डॉ. राहूल रणविर, डॉ. संज्योत गिरी, डॉ. विद्या कुलदिपक, डॉ. संजय हरबडे, डॉ. सिध्दार्थ वसेकर, डॉ. धनश्री गोन्टे, डॉ. विठ्ठल खिल्लारे आदी तज्ञ डॉक्टरांनी आपला योगदान दीला, या शिबिरास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here