चंद्रपूर जिल्‍हयातील अवकाळी पावसाने झालेल्‍या नुकसानीचे त्‍वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्‍यात यावी – राहुल पावडे

0
85

चंद्रपूरच्‍या जिल्‍हाधिका-यांना भेटून भाजपाच्‍या शिष्टमंडळाने दिले निवेदन

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

अवकाळी पावसाने चंद्रपूर जिल्‍हयासह विदर्भातील अनेक जिल्‍हयांमध्‍ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. परिणामी उन्हाळी पिकांची मोठी हानी झाली आहे, तर अनेकांच्‍या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे या नुकसानीचे तात्‍काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्‍यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी द्वारे करण्‍यात आली आहे.

या संदर्भात आज चंद्रपूर भाजपा महानगरद्वारे जिल्‍हाधिका-यांना राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्‍हा महानगर भाजपा अध्‍यक्ष राहुल पावडे यांच्‍या नेतृत्‍वात अनेक कार्यकर्त्‍यांच्‍या उपस्थितीत निवेदन देण्‍यात आले. चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये अवकाळी पावसामुळे झालेल्‍या शेतक-यांच्‍या पिकांचे, पाळीव जनावरांच्‍या मृत्‍यूचे तसेच नागरिकांच्‍या घरांचे व इतर स्‍थावर मालमत्‍तेच्‍या झालेल्‍या नुकसान भरपाईचे पंचनामे तात्‍काळ करून नुकसान भरपाई देण्‍यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी द्वारे करण्‍यात आली. यावेळी संपूर्ण जिल्‍हयात विदयुत खांब पडले तथा वाकले आहेत. या सर्व ठिकाणी युध्‍द स्‍तरावर दुरस्‍ती करावी अशीही मागणी यावेळी करण्‍यात आली.

यावेळी भाजपा महामंत्री प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, नामदेव डाहुले, रवी जोगी, आशिष देवतळे मंडळ अध्‍यक्ष संदिप आगलावे, सचिन कोतपल्‍लीवार, पुरुषोत्‍तम सहारे, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, धम्‍मप्रकाश भस्‍मे, धनराज कोवे, चंदन पाल, रामकुमार आकापल्लीवार, प्रलय सरकार , विनोद पेन्निलवीर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here