prabodhini news logo
Home ठळक बातम्या दयावान सरकार, समाजहित अभियान प्रतिष्ठान, शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ यांच्या...

दयावान सरकार, समाजहित अभियान प्रतिष्ठान, शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खुल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

0
253

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी – समाजहित अभियान प्रतिष्ठान, विर भगत सिंह मित्र मंडळ व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2024 च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित शेख सरफराज (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या सौजन्याने दिनांक 11 व 12 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ दिनांक 13 मे रोजी माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, डॉ. आंबेडकर नगर, जिंतूर रोड परभणी येथे संपन्न झाला. दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्रथम पारितोषिक मुलांमध्ये आदित्य गाढवे व मुलींमध्ये लोक स्वातंत्र्य पत्रकार संघ च्या वतीने तृष्णा कुरील, समाजहित अभियान प्रतिष्ठान द्वितीय पारितोषिक मुलांमध्ये विनोद फुके व रुग्णहक्क संरक्षण समिती मुलींमध्ये महेक शीरसे, शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ तृतीय पारितोषिक मुलांमध्ये आशिष गरंडवाल व मुस्लिम विकास परिषद मुलींमध्ये पायल शीरसे, आदींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व बंद पाकीट बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड हे होते. तसेच रघुवीर सिंग भाई टाक ( परभणी जिल्हाध्यक्ष दयावान सरकार महाराष्ट्र राज्य), समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण विभाग, जि.प.परभणी एच. ए. सय्यद, मुस्लिम विकास परिषद चे अध्यक्ष सत्तार इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या अनिता ताई सरोदे, डॉ. सुनील जाधव, इंजी. आर.डी.मगर, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे महाराष्ट्र संघटक भगीरथ बद्दर, परभणी जिल्हाध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती दिलीप बनकर, सुरेखा खिल्लारे ( महिला जिल्हाध्यक्षा रुग्ण हक्क संरक्षण समिती ), विद्रोही कवी जनमित्र प्रा. यशवंत मकरंद, संदीप वायवळ ( संस्थापक अध्यक्ष भीमा कोरेगाव मित्र मंडळ), डॉ. गोविंद कामटे, नितीन महाराज गोगलगावकर(राष्ट्रजन फाउंडेशन ), शेख अझहर, इल्यास बोगानी, हाजी शरीफ शेख, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मनोजसिंग जुंनी, प्रशांत वाटुरे, फारुख लाला, रमाताई घोंगडे, सरिताताई अंभोरे, महिमा खिल्लारे, वंदनाताई खिल्लारे, रेखा गायकवाड, मुन्नीबाई शिरसे, आयोजक वीर भगतसिंग मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे व समाजहित अभियान प्रतिष्ठान, वीर भगतसिंग मित्र मंडळ, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, रुग्ण हक्क संरक्षण समिती, मुस्लिम विकास परिषद आदी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एका निराधार विधवा महिलेस तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी चहा व नाश्त्याची हॉटेल सुरु करून देण्यासाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड यांनी 10000/- रुपये मदत म्हणून जाहीर केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरोदे यांनी व एच.ए. सय्यद यांनी प्रत्येकि 1000/- रुपये देऊन मदत केली. तसेच मुस्लिम विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने 5000/- रुपये मदत म्हणून देण्याचे घोषित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here