चिमुकल्यानी घेतले पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न

0
94


विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न बघावे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द चिकाटी ने मेहनत करावे

विजय चलाख पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. आरमोरी

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

आरमोरी :- येथील युवारंग च्या समर कॅम्प मधील विद्यार्थ्यांना आज दि.१८ मे २०२४ ला आरमोरी येथील पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी  विविध गुन्ह्यातील कायद्यांची माहिती जाणून घेतली लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मनातील मोठे स्वप्न बघण्याची न्यूनगंडाची भावना दूर करून त्यांचा आत्मविश्वास मजबुत करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन आरमोरी येते मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आरमोरी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मा. विजयजी चलाख साहेब यांनी विद्यार्थी वयात मोठे अधिकारी बनण्याचे स्वप्न बघुन स्वप्नांना प्रत्यक्षात पुर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने मेहनत घेतली पाहिजे असे मार्गदर्शन केले तर पोलीस अंमलदार मा.संजय देशमुख साहेब  यांनी पोलीस सेवेतुन जनतेची सेवा कश्या पध्दतीने करता येते यावर मार्गदर्शन केले याप्रसंगी युवारंग चे सदस्य मा. रोहित बावनकर ,प्रिन्स सोमनकार, आशुतोष गिरडकर, धनराज कांबळे, साक्षी कुंभारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here