भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे,विकी पाखरे यांनी घडविले माणुसकी चे दर्शन.

0
74

पुलगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

पुलगाव :- भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे आणि ड्युटीवर असणारे पोलीस बंधू धम्मा भाऊ मानकर विकी भाऊ पाखरे सर्वांच्या सहकार्याने मानवतेचे संदेश देत आज तळेगाव येथे रामदास नागो घोरपडे वय 66 वर्ष राहणार मलकापूर तालुका वरुड जिल्हा अमरावती यांचा उष्ण घात मृत्यू झाला कर्तव्यावर असणारे पोलीस धम्मा भाऊ मानकर यांनी मृत बॉडीचे सहानीशा केले आणि मलकापूर वरुड त्यांच्या सहपरिवारास कळवले परंतु परिवाराचे परिस्थिती अत्यंत खालावलेली ते मृतक रामदासजी नागो यांचे अंतिम संस्कार कसे करायचे पुलवगावरून आता मलकापूर कसे घेऊन जाणार पैशाच्या अभावी या संकटात या परिस्थिती कुटुंब विचारात पडले ग्रामीण रुग्णालयातून भीम आर्मी कार्यालयास फोन आला कुटुंबाची दैनंदिन हालत फोनवर सांगितल्यास अंकुश कोचे आणि त्यांचे मित्र परिवार यांनी त्यांची व्यवस्था करून दिली सहकुटुंबास हिम्मत देऊन त्यांचे प्रेत हे मलकापूर तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे पाठवलेले मानवतेचा सेवा हीच खरी असा संदेश भीम आर्मी कडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here