गडचिरोली जिल्ह्यात यंदाही मुलींची बाजी…

0
152

तिरुमलेश कंबलवार
अहेरी प्रतिनिधी

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल २७ मे रोजी संकेतस्थळावर दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.६७ टक्के इतका लागला असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत टक्का वाढूनही नागपूर विभागात मात्र चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये दहावीची परीक्षा घेतली होती.
जिल्ह्यातून १४३०५ विद्यार्थी (मुले ७ हजार ३९७ व मुली ६ हजार ९०८) प्रविष्ठ होते. यापैकी प्रत्यक्षात ७ हजार २०४८ मुले व ६ हजार ७७७ मुली अशा एकूण १४ हजार २५ जणांनी परीक्षा दिली होती.
यातील १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ७३३ मुले व ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचा टक्का ९२.८९ तर मुलींचा ९६.५७ इतका आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल सरासरी ९२.५२ टक्के इतका होता. टक्के कमी असता नाही गडचिरोली जिल्ह्याने विभागात तृतीय स्थान पटकावले होते. यंदा जिल्ह्याने सरासरी ९४.६७ टक्के गुण मिळवूनही विभागात… चौथ्या स्थानी घसरण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here