प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्या वतीने कै. गो. ब. देवल स्मृतिदिना निमित्त आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चंद्रपूरच्या बकुळ धवने या युवा नाट्य अभिनेत्रीला सन्मानित करण्यात येणार आहे.द फियर फॅक्टर या नाटकासाठी हा पुरस्कार बकुळ ला जाहीर झाला आहे. दि. 14 जून रोजी गो. ब. देवल स्मृतिदिना निमित्त यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल मुंबई येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री प्रशांत दामले यांनी नुकतीच विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे.
बकुळ धवने हिला या वर्षी स्वराज्य फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या द फियर फॅक्टर या नाटकासाठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्यपदक जाहीर झाले आहे. 20 वर्षीय बकुळ ने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनयासाठी आठ रौप्यपदके पटकावली आहे. मराठी रंगभूमी च्या क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराची मानकरी ठरल्या बद्दल येथील सांस्कृतिक वर्तुळात तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

