प्रबोधिनी न्युज नेटवर्क
थायलंड देशातील दोनशे पंचधातू बुद्धमूर्तीचा वितरण सोहळा व भिक्खु संघाची धम्मदेसना तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वणकर यांची भीमगीत संगीत रजनी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांचा सत्कार समारंभ दिनांक २७ मे २०२४ रोजी अक्षदा मंगल कार्यालय वसमत रोड येथे मोठ्या उत्साहात व धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास थायलंड येथील भंते अजंतान, भंते आनंद, भंते संतोष कुमार बुद्धगया, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष अ.भा.भि.संघ ) पूर्णा, भदंत पय्याबोधी नांदेड, श्रामनेर भिक्खु संघ तर प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार संजय (बंडु ) जाधव, प्रदेश काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख (राज्य उपाध्यक्ष), कॉ.कीर्तीकुमार बुरांडे (शेतकरी कामगार पक्ष जिल्हाध्यक्ष परभणी ), रामराव उबाळे (मा.सभापती समाज कल्याण जि. प.), प्रा.डॉ.भिमराव खाडे, काँग्रेसचे मिलिंद सावंत, भगवान जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित बौद्ध बांधवांना थायलंड येथील भंते अजंतान यांनी थाई भाषेत धम्मदेसना दिली. त्यांच्या अनुवाद भंते संतोष कुमार यांनी केला बोलताना ते म्हणाले कि, थायलंड देश पूर्णतः बुद्ध राष्ट्र आहे. डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे व धम्मदूत गगन मलिक यांनी भारतात धम्म पदयात्रा काढली. हे धम्म पदयात्रेचे कार्य थायलंड सरकारने पूर्ण देशात दाखविले आहे. धम्म पदयात्रेत आपला सहभाग होता. उपासकानी पाण्याची सोय केली. याचा सर्वांना आनंद झाला आहे. मी धम्म प्रचार प्रसारासाठी भारतात आलो आहे. बुद्ध मूर्तीचे कुठलेही मोल करता येणार नाही. ह्या मुर्त्या आपण आपल्या गावी घेऊन जा ही मूर्ती थायलंड देशातून आली आहे. यापुढेही अनेक बुद्ध मुर्त्या मिळतील. असे ते म्हणाले. भदंत पय्याबोधी धम्म देशनेत बोलताना म्हणाले कि, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी देशात महान ऐतीहासिक धम्म पदयात्रा काढली. थायलंड देश बुद्धिस्ट राष्ट्र आहे. डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित असलेले बुध्द धम्माचे कार्य डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या माध्यमातून होत आहे. भारत देश हा बौद्ध मय होण्यासाठी धम्माचे कार्य महत्त्वाचे आहे. देशात संविधान विरोधी कार्य होत आहे. डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित असलेली माणसे सत्तेत असली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो धम्मदेसनेत बोलताना म्हणाले कि, बुद्धांचा आर्य आस्टागिंग मार्ग श्रेष्ठ मार्ग असून चार आर्य सत्य वैराग्य श्रेष्ठ आहे. बुद्धांनी गृहत्याग केला व सहा वर्ष तपश्चर्या केली जगाला ज्ञान दिले. बुद्ध आशिया खंडात महान झाले. बुद्धांचे प्रतीक म्हणून ह्या बुद्ध मुर्त्या विविध मुद्रेत आपणाला पाहायला मिळतात. डॉ.सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे यांचे धम्माचे चांगले काम असून या पुढेही ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे म्हणाले कि, आपल्या सर्वांच्या सहकार्याने देशात पहिल्यांदा ५८० की.मी.ची मी भव्य धम्म पदयात्रा यशस्वी केली. जगात बौद्ध धम्म सर्वश्रेष्ठ आहे. महामानव डॉ.बाबासाहेबांचे भारत बौध्द मय धम्मचक्र गतिमान करण्याचे स्वप्न होते. थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका येथील भिक्खु भारतात येत आहेत. बुद्ध धम्माला मानणारे सर्वात जास्त भारतात आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यात दहा एकर जागेवर पाच वर्षात बुद्ध विहार उभारणार असून जगातील भिक्खु संघ बौद्ध अनुयायी भारतात येणार आहेत. परभणीचे नाव जगात पोहचणार आहे बाबासाहेबांची धम्माची चळवळ गतिमान करण्याचे काम करावे. याशिवाय दहावीच्या पाचशे विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरण्यात येणार आहे. यापुढे ही जिल्ह्यात गावागावात बुद्ध विहारात बुद्धमुर्त्या देण्यात येतील असे ते म्हणाले. यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले कि डॉ.सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे विधान परिषदेत सदस्य म्हणून गेले पाहिजे यासाठी सर्व सहकार्य करणार आहे. आज युवा पिढी समाजाला दिशा देण्याचे काम सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. यावेळी कॉ.कीर्ती कुमार बुरांडे, मिलिंद सावंत, रामराव उबाळे, बाळासाहेब देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ. प्रा.डॉ.संजय जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, अरविंद भक्ते, प्रा.डॉ.सुनिल तुरुकमाने, राजेश रणखांबे, अमोल धाडवे, मकरंद बाणेगावकर, मिलिंद सावंत, आकाश लहाने, सुधीर कांबळे, मंचक खंदारे, आशिष वाकोडे, शेषेराव जल्हारे, चंद्रशेखर साळवे, प्रदीप जोंधळे, प्रकाश हतागळे, उत्तम गायकवाड, बी.आर.आव्हाड, शशिकांत हत्तीअंबिरे , दिलीप मालसमिंदर, अमरदिप हत्तीअंबिरे, राहुल थिट्टे, चरणदास दिवसे, अक्षय जगताप, कपिल बनसोडे, राहुल मकासरे, भूषण कसबे, अजय वाघमारे, सोहम खिल्लारे, प्रेम लहाने, अंबादास तुपसमुंद्रे, सत्यशील धबडगे, अजय रसाळ आदीने विशेष अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ. सुनिल तुरुकमाने यांनी केले. या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील महिला मंडळ धम्म बांधव, युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

