prabodhini news logo
Home चंद्रपूर उद्या आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळाचे आयोजन

उद्या आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळाचे आयोजन

0
365

दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर

चंद्रपूर : स्वतंत्र प्राप्तीच्या नंतर आज पर्यंत कोणत्याही पक्षाच्या सरकारला जमले नाही ते आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांनी अवघ्या कमी कालावधीत करून दाखवलेले आहे.

दिल्ली पाठोपाठ पंजाब या राज्यांमध्ये मोफत वीज, पाणी, शिक्षा, आरोग्य, महिलांकरिता बस सेवा पाठोपाठ महिला सुरक्षा, भ्रष्टाचाराला अंकुश लावणे, प्रदूषण नियंत्रित करण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट वर भर देणे, देशात तसेच जगात सर्वाधिक इलेक्ट्रिक्ट बसेस चे शहर म्हणून दिल्ली ला मान मिळवून देणे. शहिदांना १ करोड सन्मान राशी देने, कोविड काळात सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाच्या शहिदांना प्रत्येकी १ करोड सन्मान राशी देणे, देशात कामगारांना सर्वात जास्त किमान वेतन देण्याचा मान मिळवून देणे, कंत्राटी पद्धती पूर्णपणे बंद करून कंत्राटी कामगारांना पर्मनंट करण्यावर भर देणे, भ्रष्ट्राचारावर कडक अंमलबजावनी करत स्वतःचा कॅबिनेट मंत्री ला पदावरून तथा पक्षातून हाकलपटी करणे,
इत्यादी कामाला प्रेरित होऊन पंजाब नंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम आदमी पार्टीकडे जनतेचा कौल वाढताना दिसत आहे. आत्ताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या विरोधात जनतेची सहानभूती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. अनेकांनी पक्षामध्ये जुळण्याकरिता इच्छा व्यक्त केली. म्हणूनच आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून

दिनांक ०२/०६/२०२४ रोज रविवार ला दुपारी ठीक ०२: ०० वाजता स्थळ ब्लँक गोल्ड जिम & सेलेब्रेशन हॉल बाबुपेठ चंद्रपूर शहर येथे भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी उपस्थित राहतील.
करिता आपण सर्व आमंत्रित आहात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here