prabodhini news logo
Home चंद्रपूर सर्वोदय महाविद्यालयात मनोहर मुंगले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

सर्वोदय महाविद्यालयात मनोहर मुंगले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
166

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालयात कर्मचारी मंडळाच्या वतीने मनोहर मुंगले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मदारे यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विद्या प्रसारक संस्थेचे सचिव अरविंद जयस्वाल यांनी आपल्या भाषणात मनोहर मुंगले यांच्या ३७ वर्षांच्या अविरत सेवेसाठी त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी अध्यक्षीय भाषणात मुंगले यांच्या अतुलनीय योगदानाची प्रशंसा केली. सत्कारमूर्ती मनोहर मुंगले यांनी आपल्या भाषणात सेवेतील जुन्या आठवणींना उजाळा देत, विविध अनुभव आणि जबाबदाऱ्यांची माहिती सांगितली
डॉ. नागलवाडे आणि प्रा. बोरकर यांनीही आपल्या भाषणात मुंगले यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रिझवान शेख यांनी केले तर प्रा. अमित उके यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला भैया नगोसे, तरुताई मुन, डॉ. विनय त्रिपदे, नितीन सांगुळले, निखिल जनबंधू, निलेश जयस्वाल, फुलबांधे मॅडम आणि शुभांगी मानकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here