शारदा भुयार
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, वाशिम
कारंजा (लाड) : दिव्यांग जनसेवक संजय कडोळे हे समाजसेवेकरीता नि:ष्पक्ष व निःस्वार्थ पणे कार्यरत राहून,समाजसेवेचे निःस्वार्थ कार्य करीत असतात.समाजातील दुःखी कष्टी लोकांचे अश्रू पुसण्याकरीता ते वेळोवेळी विविधांगी आंदोलने करीत असतात.आणि त्यासाठी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना वेळोवेळी मंत्री,खासदार,आमदार यांचेकडून मदतीची अपेक्षा असते.त्यामुळे सार्वत्रिक निवडणूकांपूर्वी कोणत्याही पक्षाचा खासदार झाला तरीही चालेल पण तो वाशिम यवतमाळ लोकसभा संघातील स्थानिक उमेद्वार असला पाहिजे. जेणेकरून स्थानिक व्यक्तिच्या अडी अडचणीच्या वेळी मदतीकरीता लगेच उपलब्ध होऊ शकेल ही त्यांची रास्त अपेक्षा होती. त्यामुळेच महाविकास इंडिया आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंदुत्ववादी विचार सरणीचे उमेद्वार संजयभाऊ देशमुख यांना त्यांनी पाठींबा दिलेला होता.व आपल्या लेखणीद्वारे त्यांचे करीता वृत्तपत्रातून वृत्तही प्रसिद्ध केले होते.शिवाय प्रत्यक्ष भेटीमध्ये संजयभाऊ देशमुख यांचे बद्दल, “भाऊ यावेळी तुम्हीच निवडून येणार. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.” अशी भविष्यवाणी देखील केली होती. व अखेर दि. 04 जून 2024 रोजी लागलेल्या अंतिम निकाला वरूनही ते स्पष्ट झाले. आणि संजयभाऊ देशमुख हे बहुमताने निवडून आले. त्यांच्या निवडी बद्दल बोलतांना ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी सांगितले की, या निवडणूकीच्या विजयाचे श्रेय स्वतः संजयभाऊ देशमुख यांनी गेल्या एक दिड वर्षापासून मतदार संघातील मतदारांशी प्रामाणिकपणे जनसंपर्क ठेवून संपादित केलेला विश्वास आणि शेतकरी मतदारांची शिवसेना (उबाठा) पक्षाबद्दल असलेली सहानुभूती यांना जाते. संजयभाऊ देशमुख यांच्या विजया बद्दल विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना, कारंजा तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती संघ,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषद आदी तर्फे संजय कडोळे,प्रदिप वानखडे, उमेश अनासाने,लोमेश पाटील चौधरी, अजाबराव महाराज ढळे, सुरेश हांडे,शंकर ढळे, छायाताई गावंडे, कांताबाई लोखंडे,इंदिराबाई मात्रे,सुभाष पाटील,गोपाल मुदगल, हभप माणिक महाराज हांडे, प्रतिक हांडे,कैलास हांडे आदींनी अभिनंदन केले आहे.

