काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांची विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान सह जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी घेतली भेट.

0
158

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

लोकसभा सार्वत्रिक निवडून 2024 मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत विजयानंत्तर राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस नेते ना. विजय वडेट्टीवार, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन पक्षाध्यक्ष खर्गे यांचे अभिनंदन केले. यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेस ला मिळालेल्या ऐतिहासिक विज्याबद्दल काँग्रेस अध्यक्षानी सुद्धा कौतुक करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व लोकसभा क्षेत्रातील जनतेने ज्या ज्या विश्वासाने काँग्रेस ला मतदान केले त्या विश्वासावर खरे उतरण्याच्या सोबतच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here