परळी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
परळी नगरपालिकेने शहराला एक दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून नागापूर वान धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे परळी शहराला पाच दिवसाआड ऐवजी एक दिवसाआड पाणी पुरे होईल असा अंदाज असून पावसाळाही सुरू झाला असल्यामुळे पाण्याची परेशानी न होता सर्व शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल त्यासाठी परळी नगरपालिकेने पाच दिवसात पाणी न सोडता एक दिवसावर पाणी सोडावे अशी मागणी ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा परिषदेचे प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

