अन्यथा उग्र आंदोलन छेडणार, धानोरकरांचा अधिकाऱ्यांना ईशारा.
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा ईशारा खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. बाबुपेठ उड्डाण पुलाच्या संदर्भाने आज खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह या प्रलंबित उड्डाण पुलाला भेट दिली.
खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र सुरु केले असून आज 20 जुन रोजी दु. 04.00 वा. निर्माणाधिन असलेल्या व ८ वर्षांपासून रखडलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाण पुल जनतेच्या सेवेत सुरु न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. सदर पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून या पुलाच्या अभावी अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलाची प्रतिक्षा समग्र बाबुपेठ वासीयांना असून अधिकारी मात्र या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात खासदार धानोरकर

