प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
नागपूर – दिनांक 21/06/2024 संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या वरील ईडीचे सुडाचे डाव पाहून आम आदमी पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे.
आप आदमी पार्टी नागपूर तर्फे तर्फे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी गेट महाल येथे ईडी विरोधात आणि केंद्र सरकार विरोधात नारे निदर्शने करण्यात आली.त्यात आम आदमी पार्टीचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात आम आदमी पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी भूषण ढाकुळकर राज्य संघटनमंत्री,रोशन डोंगरे संघटन मंत्री, प्रणित डोंगरे युवा संघटन मंत्री महाराष्ट्र,प्रदीप पौनिकर संघटण मंत्री, गिरीश तीतरमारे सह संघटन मंत्री, सचिन वाघाडे सचिव आम आदमी पार्टी नागपूर शहर यांच्या नेतृत्वातील नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
कनिष्ठ न्यायालयाचा जमीन रद्द होण्यासाठी इडी आता हायकोर्टात गेली. न्यायलायच्या जामीनत म्हटलं आहे की इडी एकतर्फी कार्यवाही करत असल्याचे दिसत आहे. तरी त्या जमिनाच्या विरोधात इडी कट रचून अरविंद केजरीवाल यांना दोषी ठरवण्यामागे लागलेली आहे याचा निषेध आम आदमी पार्टीने निषेध नारे देऊन केला.
आम आदमी पार्टीचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर यांना विनाकारण ईडीतर्फे मोदी सरकारच्या आदेशावर काहीही करून अंदर टाकण्याचा आदेश असल्याने ईडी हायकोर्टात जामीन रद्द करण्यासाठी गेली आहे, असा आरोप करत प्रदेश संघटन सचिव भूषण ढाकूळकर आम आदमी पार्टी यांनी केला.
आम आदमी पार्टीचे पदाधिकारी विजय धकाते, तेजराम शाहू, पंकज मेश्राम, विशाल वैद्य, हरीश वळेकर, विशाल महाजन, ज्योतीताई गौर, वीणाताई भोयर, शारदा गौर, शांताबाई वानखडे, शाहिस्ता शेख, नूरजा बेगम, पुष्पाताई डाबरे, नसरीन बानो, यास्मिन कौसर, नवश्या परवीन, रेहाना, सावित्री गोरले, शाहिधा परवीन, धीरज बोरकर यांच्या सोबत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले.

