सादगड येथील नागरिकांनी मानले विजय वडेट्टीवार यांचे आभार
दिपाली पाटिल
जिल्हा उपसंपादिका
चंद्रपूर
सावली :- आदिवासी संस्कृती मध्ये सल्ला शक्तीला अतिशय अनन्य साधारण असे महत्व आहे,त्यांचे पूज्यनीय स्थळ म्हणून सल्ला शक्तीची ख्याती आहे,तालुक्यातील मौजा.सादागड हे पूर्ण आदिवासी बिहूल गाव आहे येथील आदिवासी बांधवानी लोक वर्गणीतून आपले पूज्य स्थळ सल्ला शक्तीचे बांधकाम सुरु केले होते,परंतु बांधकाम करताना काही आर्थिक अडचणीमुळे काम थांबवावे लागले,
सल्ला शक्तीच्या पूढील बांधकामाकरिता आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सल्ला शक्ती प्रतिष्ठान सादागडचे अध्यक्ष मा.शरद मडावी यांनी तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना दिली,त्यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते मा.ना.विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक स्वरूपात मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,माजी सभापती पंचायत समिती मा.विजय कोरेवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,मा.श्रीकांत बहिरवार, मा.किशोर घोटेकर, मा.डोमाजी शेंडे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.प्रकाश लोणबले,सल्ला शक्ती प्रतिष्ठान सादागडचे अध्यक्ष मा.शरद मडावी, मा.घनश्याम मडावी,मा.वसंत मडावी, मा.किशोर जुमनाके,मा.सुखदेव मंगम तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

