हंडरगुळी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अतिक्रमणाचा गराडा..

0
140

सा.बां.खात्याला मिळतोय का नोटां चा गड्डा ? समाजबांधवांचा सवाल .

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

हंडरगुळी / देशातल्या विविध शहरां मध्ये व गावखेड्यात असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसर हे अत्यंत निटनेटका व स्वच्छ दिसतोय.तसेच अनेक ठिकाणी अशा पुतळ्याच्या परिसरात डाॅ.आंबेडकर या नावाने उद्यानेही दिसतात.माञ उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील बाबासाहेबांचा पुतळा हा याला अपवाद आहे.कारण येथील पुतळा हा गत कित्येक वर्षापासुन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन,या ठिकाणच्या अतिक्रमणास बी अॅण्ड सी,चा आर्शिवाद असल्या मुळेच ह्या पुतळ्या भोवती अतिक्रमन करणा-यांनी गराडा घातल्याचे हाळी- हंडरगुळीकरांना दिसते.माञ सा.बां. खात्याच्या अधिका-यास दिसत कसे नाही.का अतिक्रमणधारकांडून नोटां- चा *गड्डा*सा.बां.खात्याच्या संबंधित अधिका-या मिळतोय का.असे प्रश्न बाबासाहेब प्रेमींतुन चर्चीले जात असुन,हे अतिक्रमण त्वरीत हटवावेत, अन्यथा मोठे जनांदोलन करण्याच्या तयारी मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमीं आहेत.
ज्यांनी देशाला संविधान दिले तसेच शिका आणि संघटीत व्हा,असा मंञ दिला.त्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा हंडरगुळीतील राज्य मार्गालगतचा पुतळा विविध समस्या व गैरसोयीत तसेच अतिक्रमणाच्या अजगरी विळख्यात अडकल्याचे सर्व जनतेला दिसत आहे.माञ याविरुध्द कारवाही करायला व आवाज उठवा- यला कुणीही तयार नसल्याने येथील पुतळ्याचे सौंदर्य व पाविञ्य धोक्यात आल्याचे बघून डाॅ.आंबेडकरप्रेमीं सर्व सामान्य जनतेत संताप पसरला आहे. तसेच ज्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे , संविधानामुळे आमदारखासदार झाले ले महाशय पण या अतिक्रमणाकडे बघून गप्प असल्यामुळे आमदार केलं तुला खासदार केलं तुला तरी तु बेईमान झाला,माझ्या बाबासाहेबां ना,तु असा कसा बेईमान झाला*?असे बोल आजी,माजी आमदार व खासदार यांच्या चुप्पीवर ऐकू येतात. तेंव्हा याबाबत सा.बां.खात्याच्या जेष्ठ अधिका-यानी त्वरीत दखल घेऊन अतिक्रमण काढावे,अन्यथा लवकरच बाबासाहेब प्रेमीं आंदोलन करण्याची तयारी करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here