एकाच पावसाने मोकासी ले आऊट जलमय

0
110

वरोरा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

वरोरा शहराच्या मध्यवर्ती भागात दत्त मंदिर वार्ड स्थित मोकसी ले आऊट गेल्या अनेक वर्षापासून समस्यांच्या विळख्यात असून या ले आउटची स्थिती अख्या भारतात कुठे नसेल अशी केली आहे.सभोतालच्या अविकसित ले आउट धारकांनी पाणी निघण्याचे सर्व मार्ग बंद केल्याने अनेकांनी खाली प्लाट खरेदी करून अविकसित ठेवले असून त्यात नगरपरिषदेने संपूर्ण वॉर्डाचे सांडपाणी तिथे आणून सोडल्याने नेहमी घरासभोताल पाच सहा फूट पाणी वर्षभर साचून असते. घाण सांडपाण्याच्या दुर्गंधीचा व रोगराईचा रहिवासीयांना सामना करावा लागतो.नाल्या सुद्धा जिथे खोल भाग तिथे अती खोल उथळ ठिकाणी अती उथळ असा प्रकार केल्याने पाणी निघण्याची समस्या नगरपरिषदेने स्वतःहुन त्यांच्या चुकीने निर्माण केली असा रहिवासीयांचा आरोप आहे. गेल्या पंचेविस वर्षापासून रहिवासी नगरपरिषदेला अर्ज विनंत्या करून त्रासून आहे, वर्षभर पाण्यात घरं असल्याने घराला भेगा पडून केव्हा काय होईल अशी परिस्थिती आहे.अविकशीत लेआऊट धारक तथा खाली प्लाटधारकांवर कारवाई करण्याची मागणी कित्येक वर्षापासून रहिवासी करत आहे परंतु नगरपरिषद निद्रावस्थेत असून त्यांना जाग करण्यासाठी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबण्यासाठी सर्व राहिवासी एकवटले असून तशी नोटीस नगरपालिका, उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here