prabodhini news logo
Home चंद्रपूर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते परसोडी व गायडोंगरी येथे पाणीपुरवठा योजनेचे...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते परसोडी व गायडोंगरी येथे पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

0
143

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी परसोडी व गायडोंगरी या गावात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातुन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सदर काम पुर्ण झाल्याने पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

परसोडी(झिलबोडी) येथे जल जीवन मिशन अंतर्गत ३१ लाख रुपयांच्या निधीतून तर गायडोंगरी येथे ५६ लाख रुपयांच्या निधीतून सदर विकासकाम पुर्ण करण्यात आले. पुर्ण झालेल्या या विकासकामामुळे दोन्ही गावांतील सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स.सथस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अॅड आशिष गोंडाणे, अतुल राऊत, रवी पवार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सरपंच निता शेंडे, सरपंच सचिन लिंगायत, मंगेश शेंडे, कैलाश खरकाटे, रवी शेंडे, अमर गाडगे, प्रमोद भर्रे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता साहेबलाल मेश्राम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here