राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचे खासदार किरसान यांना अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली – गडचिरोली चिमुर क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ किरसान हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने होणाऱ्या 9 व्या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थीत राहणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भेट घेऊन अधिवेशनात उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारून डॉ. किरसान यांनी आपण अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. ओबीसी समाजाच्या विविध मागण्याना घेऊन गेली आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे अधिवेशन घेतले जाते. अधिवेशनास ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या वर्षीचे अधिवेशन पंजाब येथील अमृतसर येते पार पडणार आहे. या आधी झालेल्या प्रत्येक अधिवेशनास डॉ. किरसान यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली आहे. विशेष म्हणजे या वर्षी ते खासदार म्हणुन प्रथमच अधिवेशनास उपस्थीत राहणार आहेत. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या वर्षी सुधा आपल्या सोबत मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांना घेऊन येणार असे सांगितले आहे. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांना निमंत्रण देतांना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश उपाध्यक्ष सतीश वारजूरकर, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे सोबत, नलिनी किरसान, ऍड. दुष्यन्त किरसान उपस्थित होते.

