prabodhini news logo
Home अकोला लेख – लेक चालली सासरला..!

लेख – लेक चालली सासरला..!

0
145

कन्यादान असे म्हणणे पूर्वपार मला काही केल्या पटतं नाहीं. खूप वाईट वाटते, कारण दान करतात त्या म्हणजे वस्तूचा, कपड्याचा, अन्नधान्य, पैसा अडका, सोनं नाणं, शेत, जमीन, घरच्यासारखं अन्य, कन्या ही तर प्राण आहे. कन्या म्हणजे मुलगी आपल्या कुटुंबाची शान आहे. आपल्या घराचा ती अभिमान आहे. आणि महत्वाच म्हणजे ती तिचाही स्वाभिमान आहे. कन्या नाही निर्जीव वस्तू किंवा नाही दावणीची गाय. कन्या ही आईची सावली असते. ती प्रेमप्रसंगी सर्वांची माय असते. मुलीचा जन्म होताच. मुलीचे घरात आनंदाने स्वागत होते. मुलीचे जेव्हा चिमुकल्या पावलांनी घरात आगमन होते. इवल्याशा कळीच ते सुंदर फुल होते. आई-वडिलांच्या संस्कारात ते प्रतिबिंब होते. घराची ती माय बनते. भावाची ती बहीण असते. आईची ती सावली असते. तर वडिलांची ती राजकुमारी असते. घर भातकुलीच्या रंगांनी सुजून जाते. दुडूदुडू धावणार ते बाळ अचानकच मोठं होऊन जाते.मग असाच एक दिवस येतो. अंगण सजते. घर पाहुण्यांनी भरून जाते. कन्यादानाचे भाग्य आई बापाच्या ओंजळीत टाकून हे पाखरू दिल्या घरी उडून जाते. छोट्याश्या पावलांनी घरात आलेली लक्ष्मी दुसऱ्याच्या हातात देताना मनाला काय वेदना होतात या शब्दात सांगणं फार कठीण असते. एक वेळ कोणी सोन्याचं दागिना आपल्याला मागितला तर आपण दहा वेळा द्यायचा अगोदर विचार करतो. मुलगी हा अनमोल दागिना तर आपल्या हृदयातील काळजाचा तुकडा. काळजाचा तुकडा दुसऱ्यांच्या हातात देतांना जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या मनाची काय अवस्था होतं असेल. समाजामध्ये राहताना समाजाच्या काही प्रथा आहे. त्या प्रथा प्रत्येकालाच पार पाडावे लागतात. त्यातील कन्यादान एक प्रथा म्हणजेच, लग्न संस्कार, लग्न म्हटलं की दोन जीवाची एकमेकासाठी बांधलेली रेशीम गाठ दोन अनोळखी जीव एकमेकात सहज गुंतले जातात. आयुष्यभरासाठी एकमेकाची बनतात. एकमेकाची साथ प्रत्येक सुखदुःखात असते. एकमेकांसाठी आपल्या आयुष्य एकमेकांच्या स्वाधीन करतात. मुलगी म्हटलं तर घराची लक्ष्मी आणि परक्यासाठी धन. आता हाच छोटासा जीव अलगत आपल्या घरात येतो.तिथे लहानाचं मोठं होणं, अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतांना, आपल्या आनंदापेक्षा तिचा आनंद जपणं. आपल्या स्वप्नापेक्षा तिच्या स्वप्नांना जपणं. आपल्यापेक्षाही आपल्यासाठी आपली मुलगी महत्त्वाची होऊन जाते. सर्वांची लाडाची बाहुली एक दिवस सर्वांना रडवून जाते. तिने लावलेली माया एका वडिलांसाठी त्याच्या आईने लावलेल्या माये एवढी महत्त्वाची असते. एका वडिलांसाठी त्याची मुलगी म्हणजे जणू दुसरी आईच असते. तिचे कन्यादान करताना हळूच पानावलेले वडिलांचे डोळे तिच्या नजरेतून कधीच लपत नाही. लग्नाची तयारी करतांना तिचा कंठ दाखवून येतो. तसाच तिच्या वडिलांचा देखील कंठ दाटून येतो. मुलगी म्हणून जगणं सोपं नसतं. आणि आई-वडील होऊन तिचे कन्यादान करणे सुद्धा सोपं नसते. लहानपणापासून जिला आपण एवढं जपलं तिला दुःखी अंतकरणाने एका क्षणात दुसऱ्याच्या हवाली करावे लागतात. मी जशी माझ्या बाहुलीला जपले तसंच तुम्ही माझ्या बाहुलीला जपा, हें सांगताना त्या वडिलांना होत असलेल्या त्रास, वडील डोळ्यातून बोलून जातात. आजपर्यंत आपल्या घरात या लक्ष्मीने जेवढे सुख, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लावली तसेच माया प्रेम आपुलकीचे वातावरण तुमच्या घरी सुद्धा देईल. काही चूक जर तिच्या हाताने झाली तर ती पदरात घालून मोठ्या मनाने तिला माफ करा. असे कळवून जावई आणि त्यांच्या परिवाराला एक वडील सांगतात. आपल्या लेकीचे कन्यादान करणारे वडील सगळ्यांना आठवत असेल. आपल्याला कधी रडू न देणारे आपले वडील आपल्या मुलीच्या लग्नात कोणाला न दिसू देता एकांतात खूप रडतात. कारण पुरुष कधी रडत नसतात. हें मात्र लहानपणापासूनच ऐकत आलेली मुलगी. पण वडिलांचे दुःख ते पाहणे. त्या मुलीसाठी स्वतःच्या आई वडिलांचे घर सोडून, दुसऱ्यांच्या घरी जाणे तेवढेच कठीण जात असते. असे म्हणतात कीं कन्यादान देणारा सर्वात मोठा असतो. तो आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देतो. आपल्या घरातला आनंद दुसऱ्या परिवारात देऊन टाकतो. पण त्या बदल्यात एक वडील एकच मागतात, की माझी मुलगी नेहमी सुखी राहावी तिला कोणताही त्रास व्हायला नको. आम्हची मुलगी आता तुमच्या घराची सून होणार, तुमच्या परिवाराची लक्ष्मी होणार, तुमच्या परिवारात ती या घराचे असणारे नाते अजूनच घट्ट करेल. आणि तुमच्या परिवाराची उत्तम सून होईल. हीच आई-वडिलांचे सांगणे सासरच्या मंडळींना असते.

एक मात्र खरे आहे कीं, कन्यादान करताना..!
आई-वडिलांपासून दूर होण्याचा
लेकीचा त्रास लपत नाही
आई-वडिलांनी दिलेले संस्कार
ते काही केल्या सुटत नाही

लेखिका – सौ चैताली संगोपाल वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here