prabodhini news logo
Home चंद्रपूर बचाव संघर्ष समिती चंद्रपूर च्या वतीने जागतिक योगा दिन साजरा

बचाव संघर्ष समिती चंद्रपूर च्या वतीने जागतिक योगा दिन साजरा

0
135

सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादिका
चंद्रपूर

चंद्रपूर बचाव संघर्ष समिती ने जागतिक योगा दिन 2024 खूप सुंदर रीतीने साजरा केला. आमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून निवासीय उप जिह्याधिकारी, चंद्रपूर सन्माननीय संजयजी पवार आपल्या सहपत्नी सोबत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी CBSS चे अध्यक्ष आदरणीय श्री गोपाळजी मुंदडा सर होते. कार्यक्रमाचे सुंदर संचालन CBSS सचिव डॉ. सपन दास सरांनी केले.
संजय व त्यांच्या सौभाग्यवतीचे स्वागत CBSS चे अध्यक्ष Dr. मुंदडा सरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमामध्ये मुख्य उपस्थितीत पाहुणे विजयजी चंदावार सर, जिल्हा प्रभारी, भारत स्वाभिमान व उत्सव मुर्ती रवि इंगोले होते.
संजय सरांच्या परिचया में बद्दल CBSS चे जीलानी सर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला. रवि सरांचा चंदावार सरांनी स्तुतीसुमनानी वर्षाव केला.
कार्यक्रम मध्ये रवि सरांचा सत्कार संजय सरांच्या शुभ हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन केला गेला.
निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर शहर कामाबद्दल संजय सरांनी आपल्या सुंदर भाषणातून खूप छान मार्गदर्शन केले. व CBSS सारख्या सामाजिक प्रबोधन करणाऱ्या संघाची प्रशासनाला विधायक कार्य करण्यासाठी किती गरज आहे हे सुंदर पद्धतीने मांडले.
CBSS ने ‘जागतिक योगा दिन 2024’ निमित्त ‘योगाचे शारीरिक लाभ व सावधानी’ ह्या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येऊन त्यांचा गौरव केला.
चंद्रपूर शहरात योगाचा प्रचार, प्रसार विनामूल्य क्लासेस घेउन व शिबिरे भरवून सातत्याने करीत आलेल्या योग शिक्षकांचा कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मुंदडा सरांनी चंद्रपूर शहरातील मधील काही महत्वाच्या समस्यांचा उलगडा केला व संजयजी सरांनी त्यावर सामूहिक पणे विचार करुन त्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक तो मार्ग काढू असे आश्र्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी CBSS चे सभासद अशोक पूर्णये ह्यांनी सर्व उपस्थितांचे व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सभासद व व्यक्तीचे मनःपुर्वक आभार मानले.
सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला…
कार्यक्रमाची उपस्थिती हे कार्यक्रमाची विशेष जमेची बाजु होती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here