कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच पंचायत समिती येथील सभागृहात काढण्यात आली असून तालुक्यातील जामसाळा, पवणा, पवणपार, सिंगडझरी, या चार ग्राम पंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था ही गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू आहे. ग्राम पंचायत मार्फत गावात अनेक विकासात्मक योजना राबविल्या जातात. दरम्यान सोमवारी दुपारी २ वाजता पंचायत समिती सभागृहात ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यामध्ये जामसाळा अनुसूचित जाती (महिला), पवना चक नागरिकांचा मागास प्रवर्ग (स. सा.) पवनपार सर्वसाधारण, सिंगडझरी सर्वसाधारण या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले असून वरील चारही गावातील नागरिकांत आपापल्या गटाचा उमेदवार शोधण्यासाठी सोयीचे झाले आहे.
येणाऱ्या काही दिवसांत या चार ग्राम पंचायतचा निवडणुकीचा धुराळा उडणार असून सरपंच पदाची निवड थेट जनतेमधून करायची असल्याने निवडणुकीला चांगलाच रंग येणार आहे. अनेक हवसे, गवसे गुडग्याला बाशिंग बांधून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे बोलल्या जात असले तरी प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर कितीजण उमेदवारी अर्ज दाखल करतात. हे नंतरच कळणार आहे.
वरील ग्राम पंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडत करिता तहसीलदार संदीप पानमंद, नायब तहसिलदार तेलंग, चारही गावातील, तलाठी, ग्रामसेवक, आणि अनेक नागरिक उपस्थित होते.

