prabodhini news logo
Home चंद्रपूर फळ झाडाने सफल होईल संकल्प “एक पेड मेरे माँ के नाम”

फळ झाडाने सफल होईल संकल्प “एक पेड मेरे माँ के नाम”

0
136

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर – विकासाच्या नावाने निसर्गाची होत असलेली हानी,खाणी साठी प्रचंड जंगलतोड त्यामुळे वातावरणात बदल होऊन अवकर्षन,अनियमित पाऊस,अतिभीषण तापमान व गर्मी या सर्वांचा परिणाम मानवा सोबत,मूक प्राणी व जिवश्रुष्टीला मोठया प्रमाणात भोगावा लागत आहे. जम्मू, उतराखंड, हिमाचल, सारखे पहाडी व उत्तरेकडील थंड प्रदेशातील राज्याचे या उन्हाळ्यात मे मध्ये 45 डिग्री व दिल्लीत 52.3 डिग्रीसारख्या तापमानाची नोंद व जगात अति उष्णते मुळे मक्केत 1309 हज यात्रेकरूंचा व भारतात 130 लोकांचा आजच्या घडी पर्यंत मृत्यु( हा सरकारी पण प्रत्यक्षात आकडा मोठा )हे त्याचे घोतक आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राच्या पर्यावरण,वन व वातावरण बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव श्रीमती लीला नंदन यांनी 140 कोटी भारतीयांना साद घालत ” एक पेड मेरी माँ के नाम ” हा स्तुत उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे त्याचे स्वागत करतांना वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणासाठी 28 वर्षांपासून कार्य करणाऱ्या ” वृक्षाई ” संस्थेचा ट्री बॉय अजिंक्य कायरकर ची लहान बहीण भुमी कायरकर या 16 वर्षीय बालिकेने त्यांना 28 वर्षात अनुभवलेल्या जनतेच्या मनातील भावना कथन करीत फळ झाडं लावण्यासाठी जनतेला प्रेरित करण्याचा विचार व्यक्त करुन त्यांना रसायनमुक्त,स्वास्थ वर्धक,थंड सावलीने विज व मेडिकल बिलातून होणाऱ्या अनेक फायद्या मुळे जनता ते झाडं जगवून आपल्या संकल्पनेला बळ देणार असा विश्वास व्यक्त केला.
भूमीने प्रधान सचिवांना पत्र व ई मेल द्वारे देशातील नागरिक आपल्या घर-आंगण व ग्रामीण लोक शेतात आंबा सारखे अथवा त्या त्या राज्यातील वातावरण अनुसार फळ मिळणारे,घरावर व अंगणात मोठी सावली देऊन, तापमान कमी करुन विजेच्या बिलात कमी,नैसर्गिक फळाने परिवाराचे सुदृढ स्वास्थ लाभसाठी जास्त सजग राहणार व माँ के नाम लावलेल्या भावनिक वृक्षाचे संगोपन ते करतीलच असा विश्वास व्यक्त करीत उलट आजपर्यंत शासनाने सार्वजनिक स्थळी ठेकेदारा मार्फत लावलेले करोडो वृक्ष निम, शिसम, कॅशिया, गुलमोहर पुन्हा पुन्हा मागिल वर्षी सारखे त्याच गड्ड्यात लावले जात असून मोठे झालेले दृष्टीत पडत नसल्याची व जनतेचा पैसा निव्वळ खड्यात जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.ज्या सामाजिक जाणवेने सार्वजनिक गणेश,दुर्गा,सामाजिक,कामगार शैक्षणिक संस्था-मंडळाची स्थापना झाली त्या सर्व संस्थानी विना खर्चिक आंब्या सारखे फळ रोप आपल्या मंडळात तयार करुन जनतेला भेट देऊन वृक्षरोपणासाठी प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची व शासन-प्रशासन अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागानी मानव कल्याणा साठी ही जिम्मेदारी पार पाडावी अशी विनंती वजा सूचना/ सक्ती करण्याची मागणीही भूमीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here