prabodhini news logo
Home चंद्रपूर लेख – केरळ सफर

लेख – केरळ सफर

0
478

प्रत्येकाच्या स्वप्नातलं मनातलं आणि भारतातील लोकांची देवभूमी म्हणजेच केरळ..आम्ही चंद्रपूर ते एर्नाकुलम(कोची) रेल्वेने निसर्गाच्या सुंदर सानिध्यात घेतला..

एर्नाकुलम (कोची) येथे आम्ही सकाळी 10 वाजता पोहचलो व फ्रेश होऊन आम्ही कोची साईट सिन साठी निघालो .आम्ही तेथे चर्च,पैलेस बघितले .. तसेच आम्ही मच्छी मार्केट, कथकली नृत्य शैली संग्रहालय बघून आम्ही मॅरीने ड्राईव्ह या ठिकाणी गेलो.. तेथे सुंदर दृश्य होते नंतर केरळ च्या फेमस असा लु-लु मॉल ला जाऊन केरळी मसाले मोठ्या प्रमाणात खरेदी केले तसेच या ठिकाणी तेथील पारंपारिक कथकली नृत्य अनुभवले आणि कोची येथे मुक्काम केला..
प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच कोची ते मुन्नार.. आम्ही 140 km असा ४-५ तासांचा प्रवास केला… प्रवास करताना डोळ्याच्या नजरेत मावणार नाही असे रस्त्याने चहाचे व कॉफी, मसालेचे मळे बघण्यास आले मुन्नर हे हिल स्टेशन आहे , मुन्नर हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. परिसरात थंडी आणि दाट धुकं यामुळे माटुंप्पेट्टी धरण येथे बोट रायडिंग ला फार मजा आली.. तसेच इको पॉईंट बघण्या सारखा आहे येथे 3 बाजुंनी डोंगर आहे तेथे आवाज दिल्यातर 4 बाजूनी फेकतो परत आपल्याला ऐकू येतो तसेच चहाचे संग्रहालय सुद्धा बघितले आले तसेच हत्ती जंगल 5 किलोमीटर सफारी करण्यात आली तसेच मुन्नर येथे रात्री शॉपिंग करण्यास मजा वेगळीच आहे येथे चहा,कॉफी, चॉकलेट खूप फेमस आहे येथे आम्ही 2 दिवस मुक्काम केला..
आता आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच मुन्नर ते पेरियार (टेकडी) …डोंगर भागातून 100 km असा प्रवास केला येथे पोहचलो या ठिकाणी नॅशनल जंगल पार्क खूप भारी होते या पार्क जाण्यासाठी जीप ने पाण्यातून प्रवास करावा लागतो येथे अनेक वन्य आणि जलचर प्प्राणी बघण्यास मिळते या जंगलात आदिवासी गाव खूप सुंदर बघण्यास मिळाले येते आम्ही 1 दिवस मुक्काम केला.
त्यानंतर पेरियार ते त्रिवेंद्रम 190 km प्रवास करत आम्ही केरळ ची राजधानी त्रिवेंद्रम येथे पोहचलो .. कोवलम बीच येथे गेलो असेच येथे लाईट हाऊस आहे तेथून सूर्य मावळताना खूप सुंदर दृश्य दिसते.. तेथे आर्ट गॅलरी आहे तिथे अतिशय सुंदर बोलके खरे दिसणारे मेणाचे पुतळे तेथे पाहिले .. त्रिवेंद्रम मध्ये सर्वात प्राचीन ऐतिहासिक ओळख असलेल श्री पद्मनाभस्वामी मंदिर येथे गेलो…. या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि तेथील रहस्य हा एक चर्चेचा विषय आहे .. परंतु सुंदर नक्षीकाम वास्तुकलेचा उत्तम नमुना मंदिराला म्हणता येईल .. हे मंदीर रात्री खूप भारी दिसत असे या मंदीर मध्ये स्त्री ने साडी परिधान करणे आणि पुरुष ने लुंगी घालणे बंधन कारक आहे… त्रिवेंद्रम जवळ बोट जंगल सफारी केली या बोटीतून प्रवास करताना डिनोसार पिक्चर ची आठवण आली या बोटीतून प्रवास करताना दोन्ही बाजूनी व वरतुन झाडे झुडपे त्या मध्ये बोट प्रवास होत होता ..तो प्रसंग भारी होता त्रिवेंद्रम मध्ये आम्ही 2 दिवस होतो
आमच्या या देवभूमीतील एन्जॉय करण्याचा शेवटचा टप्पा म्हणजेच त्रिवेंद्रम ते अल्लपी …150 km प्रवास करत अल्लपी हाऊस बोट या ठिकाणी पोहचलो , आम्ही एक संपूर्ण दिवस या बोट मध्ये राहिलो ..या बोट मध्ये राहण्याची जेवण्याची सर्व हॉटेल सारखी व्यवस्था असते , ही बोट नदी खाडी तुन प्रवास करत असती या बोटीच्या बाहेरचा नजरा खूप भारी बघण्यास मिळाला… नदी बाजूला सुंदर असे घरे,नारळ चे झाडे, आजू बाजूला बोट बघणास आले व आम्ही एक रात्र या हाऊस बोट वर राहिलो ..केरळ टूर केली तर एक दिवस हाऊस बोटं चा प्रवास केला पाहिजे मुक्काम केला नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 50 km प्रवास करत कोची या ठिकाणी येऊन आम्ही परतीचा प्रवास केला..
अशाप्रकारे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक असणाऱ्या केरळला आम्ही भेट देऊन आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभवांमध्ये वाढ केली…

लेखिका – प्रज्ञा प्रदिप पाटिल
संचालक साची टुरिझम, चंद्रपूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here