
कृषी क्षेत्रातील राजा तुम्ही, हरित्क्रांतीचा धागा तुम्ही..!
वसंतराव नाईक साहेब शेतकऱ्यांचा आधार तुम्ही, जनतेच्या मनातील आजपर्यंच्या प्रगतीचा महान योद्धा तुम्ही..!!
सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचे प्रेरनेते तुम्ही, आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील राजकारणातील महान योद्धे तुम्ही..!
अनेक शेतकरी योजनेचे दाते तुम्ही, या आपल्या महाराष्ट्राचा भाग्य विधाते तुम्ही..!!
आले आणि गेले कित्येक नेते पण या महाराष्ट्राला हिरवी शाल पांघरणारे पहिलेच तुम्ही, रोजगार हमीचा रचिला पाया तुम्ही..!
वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्र पंचायतराजचे जाणते राजे तुम्ही, हरित्क्रांतीचा धागा तुम्ही..!!
1 जुलै कृषिदिन निमित्त मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना समर्पित
लेखक/कवि
संदीप जाधव
मुंबई पोलीस अंमलदार














