सेवानिवृत्तीनंतर ह.भ.प गोविंद महाराज पौढे गुरुजी यांचा सत्कार

0
135

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

आज शिक्षक पौढे गुरुजी यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रजन फाउंडेशन परभणी यांच्यावतीने साडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पौढे गुरुजी यांची चाळीस वर्षे शिक्षक पदावर नोकरी करून हजारो विद्यार्थी घडवून आज त्यांच्या कार्याला शिक्षक पदातून मुक्त सेवानिवृत्त झाले आहेत ह.भ.प गोविंद महाराज पौढे गुरुजी यांनी साडेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नोकरी करून आज तीस जून रोजी सेवानिवृत्ती झाली आणि त्यांच्या कार्याला मागील रामकृष्ण हरी अन्नदान छात्रालय मागील चार वर्षापासून कंटिन्यू सकाळी आठ वाजता दररोज खिचडी वाटप केले जाते म्हणून परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खिचडीवाले गुरुजी म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध झालं अनेक सामाजिक सर्व क्षेत्रात हजारो कीर्तन मोफत कीर्तन समाज प्रबोधन करणारे अशा अनेक उपक्रमातून देशाची सेवा व महाराष्ट्राची सेवा परभणीची सेवा रुग्णांची सेवा विद्यार्थ्यांची सेवा करणारे ह.भ.प महाराज पौढे गुरुजी यांच्या सेवानिवृत्तीच्याबद्दल गोविंद महाराज पौढे गुरुजी व सुवर्णाताई गोविंद पौढे या दोघांचा पती-पत्नीच्या गौरव सन्मानपत्र शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा खापरे कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प हनुमान महाराज रणेर गुरुजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वीरशैव विचार मंचचे अध्यक्ष पंचाचार्यरत्न महेश स्वामी प्रमुख पाहुणे भारत पतंजली योग स्वाभिमानी समिती परभणी चे संपर्कप्रमुख चंपालाल देवतवाल ठाकूर स्वागतप्रमुख राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्राचे सल्लागार आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे सेलूकर कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित भाषण करताना गो -गोष्ट एका सामाजिक भान अन जाण
असणाऱ्या माणसाची
विं-विनम्रता सदैव अंगी भरलेल्या
माणुसकीच्या कणसाची
द -दर्पण समाजसेवेचे हाती घेऊन
निघालेल्या प्रवासाची
पों-पोशिंदा होऊन उपाशी पोटी
आपुलकीने भरवलेल्या घासाची
ढे-ढेबर न भरले कुणालाही ना लुबाडून,
हात सदैव मदतीचा, ओढ नेहमीच
मानवतेच्या ध्यासाची….
कविताच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यशस्वी साठी माऊली मित्र परिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता रामकृष्ण हरी अन्नदान छत्रालय कार्यालय शिवराम नगर, वसमत रोड परभणी अशी माहिती संयोजक वीर वारकरी सेवासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे पत्रकारांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here