prabodhini news logo
Home चंद्रपूर आदिवासी टायगर सेना, चंद्रपूर वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

आदिवासी टायगर सेना, चंद्रपूर वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

0
167

प्रियंका मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील एका आदिवासी मुलीचा अत्यंत अमानुषपणे पद्धतीने छळ करुन व तिला जातीवाचक व अश्लिल शिवीगाळी करुन अपमानित करुन तिचा सामूहिक विनयभंग करण्यात आल्याची घटना चंद्रपूर शहरात घडली आहे.
अत्याचारग्रस्त पिडीतेने पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे लेखी तक्रार दिली असता तात्काळ गुन्हा दाखल करुन न घेता 3 दिवसानंतर गुन्हे दाखल केला गेला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आरोपीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन आज 40 दिवसाचा कालावधी लोटून गेल्यानंतरही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. आरोपी कलंकित असूनही पैश्याच्या निर्लज्ज बळावर उजळ माथ्याने मोकाट वावरत असून तुमचे पोलिस काय बाल बाका करतील अशी वल्गना करीत फिरत आहेत. आरोपी पैशाने मोठे धनलांडगे असल्याने अद्यापपावेतो त्यांना साधी अटक देखिल होत नाही ही या देशाच्या कायद्यासाठी किती शरमेची बाब आहे !
भारतीय देशात श्रीमंतांची जुलमी मालकशाही व गोरगरीबांची अत्याचारग्रस्त गुलामगीरी असा भेद निर्माण करून अभावग्रस्त सामान्य नागरिकांना कायद्याच्या कचाट्यात टाकून नागविले जात असेल तर सामान्य नागरिकांनी कुणाकडून न्यायाची अपेक्षा करायची हेच कळणे कठीण झाले आहे. हे तमाम भारतीयांचे दुर्भाग्य आहे.
या विशमताग्रस्त देशात असा प्रसंग आपल्या देखील कुटुंबातील मुलींवर येऊ शकतो. देशात सामाजिक आर्थिक अन्याय अत्याचार वाढत चालले आहेत. ह्याचा वेळीच मुकाबला करणे .त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील काही अन्यायकारक विविध विषय घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. करिता चंद्रपूर शहरातील सर्व चळवळीतील पुरोगामी सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व तमाम जनतेला कळकळीची विनंती करण्यात येत आहे की एका निरपराध मुलीला न्याय देण्यासाठी सर्वांनी एक दिवसीय आंदोलनात सहभागी होऊन पीडित मुलीस न्याय देण्याच्या दृष्टीने एकत्रित यावे हीच आपणास अंतःकरणपूर्वक विनंती.
स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय,नियोजन भवन समोर, चंद्रपूर.
वेळ- सकाळी 11 वाजता.
दिनांक- शुक्रवार 5 जुलै 2024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here