इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे आवश्यक तिथे रुग्णसेवा शिबिराचे आयोजन करण्यास समर्थ : डॉ. मंगेश गुलवाडे

0
113

इंडियन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूर व टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल फाउंडेशन तथा मतुआ महासंघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिराचे श्रीधाम कृष्ण नगर येथे आयोजन

दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील पूर्व भागात असलेल्या बंगाली कॅम्प येथील कृष्णा नगर हरी मंदिर समोर भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ही स्थानिक देव-देविकांच्या फोटोला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन हे रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे व स्थानिक मतुआ आचार्य यांच्या हस्ते झाले,तर टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल चे डॉ.आशिष बारब्दे, रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. पियुष मेश्राम निमा संघटनेचे डॉ.दीपक भट्टाचार्य, डॉ.सत्यजित पोद्दार, माजी नगरसेवक अजय सरकार, रवी लोणकर,मतुआ संघटनेचे गोविंद मित्रा, शशिकांत मोकासे, रमेन बार या पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
आरोग्य शिबिरात स्थानिकांनी रक्तदाब, शुगर तपासणी, तोंडाचे आजार,स्त्रियांचे आजार,रक्त तपासणी, थायराइड, कान,नाक,घसा, लिव्हर किडनी तपासणी, कॅन्सर तपासणी करून घेण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले आरोग्य तपासले.
कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्थानिकांच्या शैलीत करताना हरी हरी बोल असे म्हणून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. नागरिकांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे याकरिता इंडियन रेड क्रॉस सोसायटी पाहिजे तिथे शिबिराचे आयोजन करण्यात समर्थ असे प्रतिपादन आपल्या उदघाटनीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे संचालन गोविंद मित्रा तर सत्यजित पोद्दार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्विंकल ढेंगळे,नताशा देवघरे,वैष्णवी सहारे, सुभाष मुरस्कर, आरिफ काझी, चंद्रकांत वासनिक, राहुल बहादे,विवेक मंडळ,हरिश्चंद्र राय, विपुल मंडल,गुलाल दास, नरेश दास,स्वप्नील रामटेके,प्रवीण कांबळे,सुरज,गावंडे, प्रदीप विश्वास यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here