सागर शिंदे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
मालेगांव : शहरातील सामाजिक कार्यकर्ते गजानन विजय काळे यांनी नगरपंचायत अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तरीही अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शहरात या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे की आजी-माजी सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्ष नेतेमंडळी आणि कार्यकर्ते गेले कुठे? निवडणुकीच्या वेळेस मत मागण्यासाठी नेते मंडळी उत्सुक असतात, परंतु जनतेच्या समस्यांसाठी का नाही? या प्रश्नांनी मालेगाव तालुक्यातील चर्चा रंगली आहे.
आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांना भेट दिलेली नाही सर्वसामान्य जनतेला उपोषण करण्याची वेळ आली असेल तर हे नक्कीच चिंताजनक आहे, जनतेच्या समस्यांवर नेतेमंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा ही समस्या अधिकच गंभीर होऊ शकते असे मत उपोषणकर्ते गजानन काळे यांनी व्यक्त केले.

