ना.बनसोडे फक्त गूत्तेदारांचे नेते, शेतकऱ्यांचे नाही! उदगीर विम्यापासून वंचित-विवेक जाधव

0
88

बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर

उदगीर – गतवर्षीच्या खरीप हंगामात पावसाने जवळपास २९ ते ३१ दिवसांचा खंड दिला होता.तर, लातूर जिल्ह्यातील विमा भरलेल्या एकूण ८ लाख ६१ हजार ६७५ शेतकाऱ्यांपैकी केवळ ३ लाख २५ हजार शेतकाऱ्यांनाच विमा मिळू शकला आहे. तोही फक्त २५% . लातूर जिल्ह्यात जो विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्यात लातूर तालुका ५९.८२ कोटी, रेनापूर ६.४८ कोटी, औसा मतदारसंघ ५३.७० कोटी, निलंगा मतदारसंघ ४९.६५ कोटी, अहमदपुर मतदारसंघ ३८.६९ कोटी तर महाराष्ट्र राज्यात दोन वेगवेगळ्या सरकारमध्ये मंत्री असणारे ना. संजय बनसोडे यांना निवडून दिलेल्या उदगीर – जळकोटला सर्वात कमी १८.३४ कोटी रुपयांचा विमा मिळाला आहे.
यावेळी उदगीर तालुक्यातील गंगापुर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे युवा चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी असे मत व्यक्त केले की, लातूर जिल्ह्यातील पिकविम्याची जी आकडेवारी समोर आली आहे यावरून स्पष्ट होते की उदगीर – जाळकोटचे आमदार शेतकऱ्यांच्या प्राशनाबाबत किती गंभीर आहेत. उदगीरमध्ये गूत्तेदारांचा विकास करण्यासाठी ज्या तत्परतेने मंत्रीमहोदय नवनवीन इमारती – रस्ते – नाल्या मंजूर करून आणतात, त्याच तत्परतेने सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी आणि अनुदानासाठी झटले असते तर मंत्री असूनसुद्धा उदगीरला केवळ ९.९३ आणि जळकोटला ८.४१ एवढाच विमा आला नसता.
आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांची परिस्थिति काय? त्यांच्या अडचणी काय आहेत? त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या आणि बेरोजगारी संदर्भातल्या अडचणी काय आहेत? याची कसलीच चिंता एक आमदार म्हणून त्यांना असेल असे वाटत नाही. कारण, मंत्रीमहोदय एकदा सुद्धा शेतकरी विमा आणि अनुदान संदर्भात विधानसभेत बोलताना दिसले नाहीत, असेही मत यावेळी चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी मांडले.
यामुळे ना.संजय बनसोडे शेतकाऱ्यांचे नाही तर गूत्तेदारांचेच नेते आहेत की काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here