prabodhini news logo
Home चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालून बल्लारपुरातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करा – राजू...

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालून बल्लारपुरातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करा – राजू झोडे यांची मागणी

0
169

सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली असून 3 दिवस आधी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार करण्यात आला तर रविवारी बल्लारपूर शहरात गोळीबारीची घटना घडली असून एक जण जखमी झाला आहे. जिल्ह्यात वाढत चाललेली गुन्हेगारी तात्काळ मोडून काढत गुन्हेगारीवर आळा घाला व आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

बल्लारपूर येथील गांधी चौकात मालू वस्त्र भांडार या दुकानावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करून गोळीबार केल्याने दुकानदाराच्या नौकराच्या पायाला गोळी लागली आहे, दरम्यान सर्वात मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानावर अज्ञात व्यक्तींद्वारे आज दिनांक 7 जुलै ला दुपारी 12.00 च्या सुमारास झालेला पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार यामुळे बल्लारपूरात खळबळ उडाली आहे.

कधीकाळी शांतताप्रिय असलेला चंद्रपूर जिल्हा हा राजकीय संघटित गुन्हेगारीमुळे क्राईम कॅपिटल कडे वाटचाल करीत असल्याचे विदारक चित्र दिसतं आहे.त्यामुळं आता पोलीस विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना अटक करावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here