परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परळी शहरातील सीएससी केंद्रचालकाकडून व परळी शहरातील तहसील मधील दलाला कडून महिलांची होणारी लूट थांबवण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकतीच राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली असून या योजनेत महिलांना प्रत्येक महिना दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले असून त्यासाठी अनेक कागदपत्राची जुळवा युळव करण्यास सांगितले होते. व त्यातच काही कागदपत्रे ही रद्द करण्याचे सांगितले आहे. परंतु येथील सीएससी केंद्र व परळी तहसील कार्यालयातील दलाल हे न लागणारे कागदपत्रे ही उदाहरणात उत्पन्नाचे प्रमाणपत्र व डोमेसिएल हे लागणारच असे सांगून प्रत्येक महिला कडून उत्पन्नासाठी तीनशे रुपये तर ऑनलाईन करण्यासाठी शंभर रुपये व फाॅरमची किंमत दहा रुपये घेत आहेत तसेच अंगणवाडी सेविका ही प्रत्येक फॉर्मला दहा रुपये मागत असल्याची चर्चा येथील महिलातून होताना दिसत आहे. तरी संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष घालून महिलाची होणारी आर्थिक लुट थांबवावी अशी ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व पालकमंत्री बीड माननीय बजरंग बप्पा सोनवणे खासदार बीड माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय बीड माननीय उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय परळी वैजनाथ माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परळी वैजनाथ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

