सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज, परभणी – मानवी हक्क अभियान जिल्हा कार्यालय परभणी येथे दैनिक समाजहित न्युजचे संपादक मा प्रमोद अंभोरे यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा मानवी हक्क अभियान परभणी जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके यांनी पुष्पहार घालून छोटेछानी सत्कार करण्यात आला.
तसेच मानवी हक्क अभियान च्या वतीने गेल्या 35 वर्षापासून अतिक्रमित गायरान जमीन, दलित आदिवासी अन्याय अत्याचार, उसतोड मजुर, शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी काम करत आहे.
कर्मवीर ॲड एकनाथ (जिजा) अवाड साहेब यांच्या नंतरही मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापिठा दिल्लीचे प्रो डाॅ मिलिंद अवाड मानवी हक्क अभियान संघटना चालवित आहेत.
मानवी हक्क अभियान करत असलेल्या कामाबाबत माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.
यावेळी पत्रकार शैलेश डहाळे,पत्रकार बाबा सुतारे,चक्रधर मोरे अदी मान्यवर उपस्थित होते.

