मातंग / मादगी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती

0
208

60 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांनी 25 जुलै पूर्वी अर्ज सादर करावा

तिरुमलेश कंबलवार, अहेरी- गडचिरोली सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रीकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये मातंग समाजातील मांग, मातंग, मादगी व तत्स्म 12 पोटजातील विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त झाले असतील अश्या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहुन अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येणार आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजामधील अनुसुचीत जातीतील मांग, मातंग, मादगी, मादीगा व तत्स्म 12 पोटजातील विद्यार्थ्यांकडुन शिक्षवृत्ती करीता आवेदन मागवण्यात येत आहे. तरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.
त्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जासोबत टि.सी., जातीचा दाखला, गुणपत्रीका,

उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, 2 पासपोर्ट व बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून जिल्हा व्यवस्थापक लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.चे मागे, कॉम्पलेक्स गडचिरोली यांच्याकडे 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावे. असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), गडचिरोली चे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here